|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||

पिंपरी चिंचवड  : सिलंबम स्पोर्ट्स फेडेरेशन च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच सिलंबम खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले, आंतरराष्ट्रीय सिलंबम महासंघाचे प्रशिक्षक मा. रवींद्रन, मा. प्रकाश, मा. सुचिता हे तीन प्रशिक्षक मलेशिया देशातून आपल्या पिंपरी चिंचवड येथे सिलंबम खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी आले होते,


सदर प्रशिक्षण मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल, यमुनानगर निगडी येथे झाले, या प्रशिक्षणाला पिंपरी चिंचवड मधील, सिलंबम खेळाडू, सिलंबम प्रशिक्षक, यांनी सहभाग नोंदवला, प्रशिक्षणामध्ये काठीची लढाई, काठी फिरविणे, तलवार फिरविणे, माडू फिरविणे अशा प्रकार चे प्रशिक्षण देण्यात आले,
यावेळी सिलंबम स्पोर्ट्स फेडेरेशन चे अध्यक्ष मा. संजय बनसोडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले सत्कार केला

यावेळी संघटनेचे सचिव मा. किरण अडागळे यांनी कार्यक्रमाची प्रस्थावना सादर केली, कार्यक्रमाचे व्यवस्थापन संघटनेचे खजिनदार स्मिता धिवार, पदाधिकारी रविराज चखाले, केतन नवले, अभय नवले, अजय नवले, गणेश चखाले, गणेश गेजगे, अर्चना अडागळे, नीलम कांबळे यांनी केले, सिलंबम खेळामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध पदके जिकूंन भारत देशाचा गौरव वाढवावा या उद्देशाने सदर प्रशिक्षण आयोजित केले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version