|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड : त्याच बरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सुद्धा दुपारी 12 वाजता जाधववाडी येथील CNG पेट्रोल पंपासमोर होणार आहे. या कार्यक्रमासाठी *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदामंत्री राधकृष्ण विखे पाटील, गृह निर्माण ( शहरी ) राज्यमंत्री योगेश कदम* हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

*या कार्यक्रमाचे होणार भूमिपूजन*

* पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय इमारत ,

* महाळुंगे औद्योगिक पोलिस संकुल,

* देहूरोड पोलिस विश्रामगृह,

* पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालया भूमिपूजन

* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अग्निशमन केंद्र ,आणि प्रबोधिनी इमारत भूमिपूजन ,

* आकुर्डी अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन .

*या विकास प्रकल्पांचे होणार लोकार्पण*

* चिंचवड येथील तालेरा रुग्णालय नवीन इमारतीचे उद्घाटन,

* शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात असलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू यांच्या कलाकृती याचे उद्घाटन.

* स्मार्ट सिटी अंतर्गत उभारलेल्या विविध प्रकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन

Share.
Leave A Reply

Exit mobile version