प्रतिनिधी:संजय वाईकर
पुणे : पुण्याच्या रस्ते वाहतुकीचे तिन तेरा वाजले आहे. कधी कुठल्या मार्गावर अपघात घडेल याचा नेम नाही. अशातच हिंजवडीमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या रेडीमिक्स डंपर एका दुचाकीवर पलटी झाला.
डंपरखाली सापडल्यामुळे दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या भयानक अपघातात २ विद्यार्थिनींचा चिरडून मृत्यू झाला. या दोन्ही तरुणींचा मृतदेह अक्षरश: फावड्याने गोळा करावा लागला होता. हे दृश्य पाहून उपस्थितीत लोकांच्या काळजात धस्स झालं.
हिंजवडीमधील मान रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी झाला होता. डंपर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे डंपर पलटी झाला, तेव्हाच डंपरच्या खाली दोन तरुणी आल्या. डंपर अंगावर पडल्यामुळे या दोन्ही तरुणी जागीच ठार झाल्या. प्रांजली महेश यादव (वय २२, राहणार माढा) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, राहणार शेगाव, अमरावती) अशी मृत्यू झालेल्या तरुणींची नाव आहे.
या दोन्ही तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आल्या होत्या. प्रांजली यादव आणि आश्लेषा गावंडे या दोघी एमआयटी कॉलेजध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या. नेहमी प्रमाणे त्या आपल्या रूमकडे स्कुटीवरून येत होत्या. त्याचवेळी रेडिमिक्स डंपर वळणावर आऊटऑफ कंट्रोल झालं आणि पलटी झालं. त्याचवेळी प्रांजली आणि आश्लेषा डंपरखाली सापडल्या. अवघ्या काही सेंकदातही घटना घडली, त्यामुळे दोघींना जीव वाचण्यासाठी वेळही मिळाला नाही. तब्बल 32 टन या डंपरच वजन होतं.
तब्बल ३ क्रेनच्या मदतीने रेडिमिक्स डंपर बाजूला करण्यात आलं. डंपर जेव्हा बाजूला झालं तेव्हा दृश्य पाहून सगळेच हादरले. दुचाकीचा चेंदामेंदा झालाच होता. पण दोन्ही तरुणीचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. दोन्ही तरुणीचे मृतदेह हे फावड्याने गोळा करावे लागले होते. घटनास्थळी पोलीस लगेच दाखल झाले. त्यांनी डंपरचालकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या दोन्ही तरुणीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
