उत्तरप्रदेशातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपीला केली अटक, भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या दिले ताब्यात*

पिंपरी । अमोल बेडके ।

कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने एकाची कागदपत्रे घेत त्या आधारे शॉप ऍक्ट लायसन्स व उद्यम आधार काढून त्यानंतर, कंपनीच्या नावाची बनावट बिले तयार केली व एक कोटी तीन लाख रुपयांचा जीएसटी न भरता राज्य शासनाची फसवणूक केली. हा प्रकार मोशी येथे घडला होता. या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी फरार झाला होता. त्या फरार आरोपीस पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधून अटक केली. तर त्याचा साथीदारही फरार होता. तो फरार आरोपीदेखील पोलिसांना शरण आल्याने आता दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी दीपक गोरक्षनाथ भगत (रा. शिव रोड, मोशी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार मोहम्मद कैश रेहमानी (वय ३०, रा. कुदळवाडी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने फिर्यादीला कर्ज काढून देण्याचा विश्वास दाखवून फिर्यादीकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल घेतले. त्यानंतर, या कागदपत्रांच्या आधारे आरोपीने फिर्यादीच्या नावे डी. बी. एन्टरप्राईजसेस कंपनीचे शॉप ॲक्ट लायसन्स, उद्यम आधार काढून ही कंपनी जीएसटी रजिस्टर केली. त्यानंतर, कंपनीच्या नावे बनावट बिले तयार करून कश्यप ट्रेडिंग कंपनी व इतर कंपनीस बिले दिल्याचे जीएसटी ऑफिसच्या पोर्टलवर नोंद केले. 6 एप्रिल 2023 ते 29 एप्रिल 2023 या दरम्यान डी. बी. एन्टरप्रायझेस कंपीने कश्यप ट्रेडिंग कंपनीस सुमारे 5,39,31713/- पाच कोटी, एकोणचाळीस लाख, एकतीस हजार सातशे तेरा रुपये एव्हढा बिझनेस केला व त्या बदल्यात 1,03,71568.70/- दिपक भगत याच्या नावाने काढलेली डी. बी. एन्टरप्रायझेस या कंपनीवर एक कोटी, तीन लाख, एकाहत्तर हजार पाचशे अडूसष्ट रुपये सत्तर पैसे इतके जीएसटी भरणे बाकी असल्याचे जीएसटी पोर्टलवर दाखवत आहे. तसेच जीएसटी न भरता फिर्यादी व शासनाची फसवणूक केली.

या प्रकरणी दिपक भगत यांनी मोहम्मद अहमद उर्फ आदिल रेहमानी व मोहम्मद कैश रेहमानी यांची भोसरी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून पहिले आदिल रेहमानी यास उत्तर प्रदेशमधून अटक केली त्यानंतर त्याचा साथीदार मोहम्मद कैश रेहमानी हा पोलिसांना सरेंडर झाला. भगत यांच्या तक्रारीनुसार या दोन्ही आरोपींविरोधात एफआयआर दाखल झाला असून, पुढील कारवाई भोसरी एमआयडीसी पोलिस करत आहेत.

 

Share.
Leave A Reply

Exit mobile version